सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील पहिली ते पाचवीच्या शिक्षकांचे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण उत्साहात पार पडली.
पहिल्या टप्प्यात १५० शिक्षकांचे प्रशिक्षण एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एम.आय.डी.सी. सोलापूर येथे दि.१२ ते १६ डिसेंबर या कालावधीत झाले.
यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले,जागतिक स्तरावर आपला विद्यार्थी टिकण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे. गुणवत्तेबरोबर सुजाण व जबाबदार नागरिक बनण्यासाठी तसेच विद्यार्थ्याला प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व सक्षम बनविण्यासाठी सर्व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रशिक्षण सुलभक म्हणून वळसंग बीटचे विस्तार अधिकारी गुरुबाळ सणके, केंद्रप्रमुख देवीदास वाघमोडे,बी.आर.सीचे विषयतज्ञ सिद्रामय्या स्वामी, राजेंद्र डांगे, मनोहर राठोड,दिपक मोरे, हिरामण पवार, संतोष कलशेट्टी, अनिल राठोड आदींनी काम केले. प्रोजेक्टरद्वारे सर्व घटकांची माहिती देण्यात आली.प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी जयश्री सुतार, कुंदा राजगुरू, जगन्नाथ राठोड, संतोष मुरुमकर आदींचे सहकार्य लाभले.