पंढरपूर प्रतिनिधी
रनर्स असोशियन पंढरपूर तर्फे रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित होणाऱ्या चौथ्या DVP पंढरपूर मॅरेथॉन ची पहिली आढावा बैठक 'विठ्ठल इन' या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
संस्थेचे सचिव बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रथमच यावर्षी होणाऱ्या मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन मार्फत केले जाणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मुदत २० जानेवारी २०२४ पर्यंत आहे. स्पर्धेची सर्व माहिती अध्यक्ष भारत ढोबळे व खजिनदार विश्वंभर पाटील यांनी सांगितली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी श्री मोहन यादव सरांनी "सर्व क्रीडा शिक्षकांना व क्रीडाप्रेमींना आपल्या शाळेतील , परिसरातील धावपटूंना सहभागी करून घेण्याचे आव्हान केले." या कार्यक्रमाला रनर्स असोसिएशन पंढरपूरचे सर्व संचालक, सदस्य व स्त्री-पुरुष धावपटू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता पाटील व आभार उपाध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे यांनी केले.