पुणे प्रतिनिधी
अखंडित कल्याणकारी काव्यसमुहाचे २४ डिसेंबर २०२३ रोजी पहिले राज्यस्तरीय कवीसंमेलन हडपसर पुणेच्या पुण्यभूमीत शानदार पार पडले.
सविस्तर माहिती अशी की, लातूर येथील अखंडित कल्याणकारी बहुद्देशिय शिक्षण व विकासकार्य संस्था,लातूर.रजि.नं.एफ-0027053 LTR. व्दारा आयोजित अखंडित कल्याणकारी काव्य समूहाचे दि.२४ डिसें.२०२३ रोजी हडपसर पुणे येथे पहिले राज्यस्तरीय कवीस़मेलन घेण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे सचिव व समूहसंस्थापक अध्यक्ष प्रा.कल्याण राऊत,संस्थेच्या अध्यक्षा सौ कोमल राऊत संमेलनाचे अध्यक्ष (जेष्ठ साहित्यक) मा. सुधाकर झिंगाडे,उमरगा. कवी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. पुरूषोत्तम हिंगणकर महाराज,अकोला. प्रमुख पाहुणे (जेष्ठ साहित्यिक) प्रा.शरदचंद्र काकडे (देशमुख) दुसरे प्रमुख पाहुणे म.न.पा पुणे नगरसेवक हडपसर मारूती (आबा)तुपे,पुणे यांच्या उपस्थितीत पहिले राज्यस्तरीय कवीस़मेलन घेण्यात आले.
संमेलनात संगिता नागदिवे यवतमाळ याचा हळवे गुंजन आणि प्रतिमा काळे पुणे यांचा आईची प्रतिमा काव्यस़ग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. संस्थेतर्फे पहिल्याच वर्षी ब्युटी क्वीन 2023 पुणे येथील सौ.सुवर्णा राऊत याचा गौरव करून प्रथम पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक प्रा.कल्याण राऊत लातूर यांनी केले. लातूरच्याबाहेर आयोजन करून साहित्य क्षेत्रात एक मैलाचा दगड बनू पहात आहेत.प्रसंगी प्रमुखपाहुणे संमेलनाध्यक्ष याचे मार्गदर्शन होऊन राज्याच्या विविध कानाकोप-यातून आलेल्या कवींचे काव्यवाचन पार पडले.
यात सर्वस्वी गोंदियावरून आलेले महेंद्र कोल्हटकर,कलावती कोल्हटकर देवंग्याचे डोकेपाटील, नगरच्या सुजाता रासकर,नंदा कोकाटे मुंबईचे प्रमोद सुर्यवंशी, संभाजीनगर चे पवन वीसपुते,संगिता नागदिवे यवतमाळ,मुळ लातूरचे संघपाळ कांबळे,अँड.उमाकांत आदमाने पुण्याच्या योगिता कोठेकर,वंदना सुतार,सोलारपूरचे अशोक मोहिते बीडच्याराजश्री लाहोर पुणेतील योगेश हरणे,गौरव पुडे सुत्रसंचालन निलंगा येथील कवी सागर गुरव यांनी केले. राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता करण्यात आली.