पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
“पंडीत प्रदीपजी मिश्रा यांचे महाशिवपुराण या कार्यक्रमासाठी पंढरपूर शहरात आलेल्या भाविक भक्तांचे सोन्याचे दागिने चोरणा-या परराज्यातील एकुण १३ महीला व ०१ पुरुष यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील चंद्रभागा बस स्टॅण्ड या ठिकाणी दि २५/१२/२०२३ ते३१/१२/२०२३ या कालवधीत पंडीत प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असुन सदर ठिकाणी लाखोच्या संख्येत परराज्यातील भक्त भाविक आलेले आहेत. सदर ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांचे मौल्यवान दागदागिने, साहीत्य व इतर वस्तुंची चोरी होउ नये म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन साध्या वेषात विविध पोलीस पथके नेमुन गुन्हयांना प्रतिबंध करावा व झालेले गुन्हे उघड करावेत असे आदेश केले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉ. अर्जुन भोसले, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांचे मागदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध पथके तयार केली होती. त्यानुसार कार्यक्रमाचे ठिकाणी गदीच्या ठिकाणी साध्या वेषातील पोलीसांनी राज्य-उत्तर प्रदेश, राजस्थान येथील एकुण १३ महीला आरोपी व एक ०१ पुरुष आरोपी यांना पोलीसांनी चोरीच्या गुन्हयात अटक केली आहे.
सदर बाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल असलेले १) गुन्हा रजि क ७८८/२०२३ भादवि कलम ३७९, २) गुन्हा रजि क ७८९/२०२३ भादवि कलम ३७९ ३) गुन्हा रजि क ७९०/२०२३ भादवि कलम ३७९, ४) गुन्हा रजि क ७९०/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रतिम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे अरूण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, सपोफौ नागनाथ कदम, पोह १०६३ बिपीन ढेरे, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह ४१९ शरद कदम, पोह १००५ पठाण, पोह २२१ औटी, पोह १७८९ सचिन हॅबाडे, पो.ना. १७३६ सचिन इंगळे, पो.ना. ४८४ सुनिल बनसोडे, पो. ना. ५६२ राकेश लोहार, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने यांनी केली आहे.