"जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गावोगावी शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंचपदावर असलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे".__ॲड.चंद्रकांत आ. नाईकवाडे
सोलापूर प्रतिनिधी ॲड.शिवाजी कांबळे
यातील हकीकत अशी की उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना तेलगावचे हे प्रकरण आहे.यात तक्रारदार बंडू हरिदास पुजारी यांनी २०२१ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीचा तीन वर्षांनंतर निर्णय झाला आहे. तेलगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, उपसरपंच व सरपंच म्हणून काम केलेल्या मोहन लांबतुरे यांनी मूळ १५ ३२ जागा वाढवून १५ ५० करुन २७० स्केअर फूट अतिक्रमण केले होते. याशिवाय लगतच्या पाण्याच्या टाकी लगत शौचालयाचा टॅक बांधून अतिक्रमण केले होते. बंडू पुजारी यांच्या तक्रारीनंतर बीडीओंनी तेलगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करुन अहवाल सादर केला. त्यात मोहन लांबतुरे यांनी २७० फूट अतिक्रमण केल्याचे म्हटले होते. लांबतुरे यांनी ही जागा तहसीलदारांनी दिल्याचे म्हणणे सादर केले मात्र तसा कोणताही पुरावा दिला नाही. यामध्ये बंडू हरिदास पुजारी यांचे वकील ॲड. चंद्रकांत आ नाईकवाडे यांनी जोरदार युक्तिवाद केला व आवश्यक ते दाखले सादर केले त्यांचा हा युक्तीवाद ग्राह्य धरून
मा् जिल्हाधिकाऱ्यांनी मोहन लांबतुरे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गावोगावी शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंचपदावर असलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
उत्तर सोलापूर सीना तेलगावचे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंच असताना शासकीय जागेत केलेले अतिक्रमण चांगलेच भोवले असून तेलगावच्या मोहन लांबतुरे यांना ग्रामपंचायत सदस्यत्व गमवावे लागले आहे.
सात सदस्य असलेल्या तेलगाव ग्रामपंचायतीच्या मोहन लांबतुरे यांचे सदस्य पद रद्द झाल्याने आता ६ सदस्य राहिले आहेत. या ६ सदस्यांमध्ये सरपंच रेवणसिद्ध पुजारी, काजल रोहित बनसोडे व विमल भानुदास छत्रे हे भाजपाचे तर विरोधी गटाचे तीन सदस्य आहेत.यात तक्रारदार बंडू पुजारी यांचे तर्फे ॲड.चंद्रकांत आ. नाईकवाडे,ॲड आकाश कळकिळे ॲड शिवाजी कांबळे ॲड.शाहीन शेख ,ॲड संजय कांबळे यांनी काम पाहीले