वृद्ध कलावंत मानधनात वाढ होणार सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांची ग्वाही
नागपूर प्रतिनिधी
बुधवारी महाराष्ट्रातील लोककलावंत शाहिरांच्या मोर्चाला नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून सुरुवात झाली नागपूर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रतुन महिला पुरुष लोककलावंत शाहीर मोर्चात सहभागी झाले होते वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे कलाकारों की मांगे पुरी करो नही तो खुर्ची खाली करों नाही कुणाच्या बापाचं आम्ही मागतो आमच्या हक्काचं हम सब कलाकार एक है अशा घोषणा देत विधानभवनावर मोर्चा धडकला विविध संस्थांच्या वतीने लोककलावंत व शाहीर यांचे हितासाठी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
यामध्ये वृद्ध कलावंतांच्या मानधनात रकमेत वाढ करून रुपये आठ हजार ते 9000 दहा हजार इतके असावे अ ब क दर्जा नुसार त्याची मुदत किमान तीन वर्षाची असावी व नंतर रक्कम वाढवावी जिल्हा समितीमध्ये फक्त वार्षिक 100 मानधन प्रकरणे मंजुरी असतात त्या मानधन प्रकरणाची संख्या 5 00 ऐवढी करावी कारण मागील शेकडो प्रकरणी प्रलंबित आहेत वृद्ध कलावंत वयोमर्यादा वय 50 वर्षे आहे ती वय 40 वर्षे करावी कारण आयुष्यभर प्रवास व अनियमितता अशा कारणाने वृद्धत्व लवकर येते इनकम सर्टिफिकेट 48 हजार रुपये वरून दोन लाख रुपये करण्यात यावी सर्व शाहीर कलाकार यांना प्रात्यक्षिक सादर करून मूळ कागदपत्र चेक करून मानधन अर्ज स्वीकार करावे जेणेकरून खऱ्या शाहीर लोककलाकारावर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी वृद्ध कलावंतास शासनाकडून सर्व आरोग्यसेवा मोफत मिळण्यात यावी.
याबाबत आधार कार्ड प्रमाणे वेगळे शासनमान्य ओळखपत्र शिखर संस्था सभासद कलावंतास घ्यावे वृद्ध कलावंत मानधन रक्कम कलावंतांच्या बँक खात्यात जमा व्हावी त्यात दर महिन्यात अथवा तिमाहीत नियमितपणा असावा लोककलावंत शाहीर हे तालुका पातळीवर राहतात त्यांचे राहते गावी घर बांधकामास बँक तर्फे संपूर्ण बिनव्याजी शासन शिफारशीने कर्ज मिळावे त्यांचे हक्काचे घर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल बँक हप्ते सोईस्कर असावेत वृद्ध कलावंतांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनानेच करावा म्हणजे ते संपूर्ण शिक्षण शिकू शकतील सांस्कृतिक कार्य विभागाप्रमाणेच कलावंत व वृद्ध कलावंत सहाय्य विभाग असा स्वतंत्र शासनाचा विभाग असावा.
सदर विभाग सांस्कृतिक आणि सामाजिक न्याय दोन्ही विभागाशी संलग्न असावा सर्व कलावंतास एसटी प्रवास व रेल्वे प्रवास संपूर्ण मोफत म्हणजे विना शुक्ल असावा तसेच आमदार पत्रकार याप्रमाणे कलाकार असं नामांकन राखीव असावे जो त्यांच्या सेवेचा गौरव आहे कलावंतांना प्रवास करताना सोबत एक व्यक्ती विनाश शुक्ल अशी व्यवस्था असावी समाजभूषण प्रमाणे कलावंत सहाय्य विभागाचे कलावंत संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात एक कार्यालय असावे कलाकारास अपघात विमा मिळावा शेतकरी मित्र अपघात विमाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक भवन बांधून द्यावे वृद्ध कलाकारांची इच्छा असल्यास आणि तो शारीरिक मानसिक दृष्ट्या योग्य असल्यास तालुका जिल्हा शहर पातळीवर विविध समित्यांमध्ये त्यास कार्यरत ठेवावे जेणेकरून त्याला मिळणाऱ्या शासन योजनेचा फायदा चा शासनाला बोजा होणार नाही वृद्ध कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे पत्नीस योग्य ती कागदपत्रे पुरावे सादर झाल्यानंतर त्वरित मानधन सुरू व्हावे ज्या कलावंतांना शासनाचे मानधन मिळते अशा कलावंतांना ओळखपत्र देण्यात यावे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मार्फत देण्यात यावे.
शासनमान्य वृद्ध कलाकारांना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे उदाहरणार्थ इंदिरा गांधी पंतप्रधान आवास योजना लोककलावंतासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे खडीगंमत पॅकेज प्रमाणे खडी दंडार खडी टाका संगीत नाटक पॅकेज जाहीर करण्यात यावे आळंदी देहू येथे ह भ प कीर्तनासाठी भव्य सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे आळंदी देहू येथे ह भ प बाल व युवा नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छात्रवर्ती देण्यात यावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत जगनाडे महाराज वंदनीय संतांना भारतरत्न देण्यात यावे श्री संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीता आणि इतर साहित्याचा शालेय शिक्षणात व विद्यापीठाच्या शिक्षणात पाठ्यक्रम समाविष्ट करण्यात यावे श्री संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.
विधानपरिषद मध्ये नागपूर जिल्हा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मधून एकूण सहा शाहीर कलावंतासाठी राखीव करण्यात यावी आदि मागण्याचे वाचन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व शाहीर राजेंद्र बावनकुळे नागपूर यांनी केले तर मार्गदर्शन लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे सोलापूर सचिव शाहीर बाळासाहेब मालुसकर पुणे शाहीर उत्तम गायकर नाशिक शाहीर शिवाजी शिंदे अहमदनगर शाहीर कवी नंद गायकवाड वाशिम शाहीर परिहार जालना शाहीर अशोक शिंदे लातूर यांनी केले लोककलावंत शाहीर कलावंतांचे मागण्याचे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीरजी मुनगट्टीवार यांना विधान भवनात देण्यात आले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली माझ्या नावातच धीर आहे लोककलावंतांनी शाहीरांनी थोडा धीर धरावा चालू अधिवेशनात आपल्या सर्व मागण्यावर परिपूर्ण विचार केला जाईल वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ निश्चित केली जाईल अशी ग्वाही मा सांस्कृतिक मंत्री यांनी दिली व निवेदन स्वीकारले या लोककलावंत शाहिरांच्या मागण्यासंदर्भात नेहमी लोक कलावंतांच्या न्याय हक्काला वाचा फोडणारे मंत्रालयाचे पत्रकार माननीय खंडुराजजी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले लोककलावंत शाहिरांचा मोर्चा शांततेत पार पडला.