पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेने केलेली करवाढ रद्द केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा पंढरपूर शहरातील विविध भागातील नागरिकांनी सन्मान सत्कार केला.
संत पेठ परिसरातील बडा कब्रस्तान परिसरातील मुस्लिम बांधव व विविध सामाजिक संघटना ,छत्रपती संभाजी महाराज चौक येथील पैलवान सोमनाथ अधटराव आणि मताभगिनी तसेच पैलवान सिद्धनाथ कोरे मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.