पालम प्रतिनिधी
पालम तालुक्यातील पेंडू येथील जागृत देवस्थान श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यात्रा असल्याने भाविक भक्त मोठ्या भाव भक्तीने व हजारोच्या संख्येत आपल्या मनोकामना घेऊन महाराजांकडे साकड घालतात, आणि महाराज प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करतात.
होता कृपा तुमची पशू बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध, या संताच्या उक्तीनुसार सर्व साक्षात्कार घडतो.निष्काम सेवेचे पाईक हभप अमोल महाराज खोरसकर यांनी श्री संत योगीराज निवृतीनाथ महाराज यांच्या चरणी बासस्ट किलोचा अर्पण केला असता त्यावेळी अशा महान संताच्या पावन पवित्र ठिकणी हभप श्री शेषराव सोपणे यांच्या धार्मिक क्षेत्रातील निष्काम सेवेची दखल घेवून, श्री संत योगीराज संस्थान पेंडू येथील कमिटीने श्री संत योगीराज निवृतीनाथ महाराज यांच लिला चरित्र देऊन सत्कार केला.
श्री संत योगीराज निवृतीनाथ महाराज यांच्या पावन भूमिमध्य मला मान मिळाल्याने खरोखरच अलभ्य लाभ मिळाला हे माझे भाग्य म्हणावे लागेल.