पं.संजय गरुड यांच्या गायनाने रसिक भक्तीरसात चिंब
पुणे प्रतिनिधी
महोत्सव२०२३ , १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान संपन्न होत आहे यामध्ये पहिल्या दिवशी पंडीत संजय गरूड गुरुजी यांनी सादरीकरन करून गयणाचा एक उच्चांक गाठला व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
पंडीत संजय गरुड गुरुजी हे किराणा घराण्याचे गायक असुन त्यांनी स्वतःची ऐक वेगळी छबी ही गायनातुन निर्माण केले आहे
महोत्सवात पंडीत संजय गरूड यांनी राग भिंपलास नि सुरुवात केली राग स्वरुप मांडत गुरुजींनी वातावरण निर्माण केले भारदस्त आवाजात शास्त्रीय गायनाचे सादरीकरण केले व शेवटी 'माझे माहेर पंढरी' हा अभंग गाऊन साक्षात पंढरीचा पांडुरंग सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात उभा केला अथांग जनसमुदाय पांडूरंगाच्या भजनात देहभान हरपून नाचू लागला
पं. संजय गरूड गुरुजींनी गायकीतुन सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.गायनाला तबलासाथ रोहन पंढरपूरकर, हार्मोनियम शांतीभुषण चारठणकर,टाळ माऊली टाकळकर,सारंगी फारुक लतिफ, पखवाज माऊली फाटक स्वरसाथ सचिन चोरगे यांनी केली.
अशा या मैफीलीत तबला वादनाची सुवर्ण अनमोल संधी मला गरुड गुरुजींनी दिली खरच मनापासून मी त्यांचा अभारी आहे.
मी रोहन पंढरपुरकर पेनुर गावचा रहीवाशी माझ्या कलेचा पाया माझे आजोबा हणुमंत गोरे यांनी भरला ते एक उत्तम गायक होते त्यांनी मला पखावज शिकविण्यासाठी माझे पहिले गुरुजी दिगंबर नाना भाकरे यांच्या कडे पाठवले ६ वर्ष मी पखावज शिकलो वृध्दत्वामुळे नाना गेले. जाता जाता त्यांनी मला तबला शिकण्यासाठी जा संगितले व मी पं.प्रमोद दादा पाटील यांच्याकडे तबला शिकण्यास प्रारंभ केला व विशारद पुर्ण केले दादांनी खुप प्रेमाणे मला शिक्षण दिले व पुणे येथे पुढील शिक्षणासाठी पाठविले पुणे येथे ललीत कला केंद्र पुणे विद्यापीठ येथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण चालु झाले व मला गुरु म्हणुन पंडीत उमेश मोघे लाभले गेली ११ वर्ष मी गुरुजींकडे शिकत आहे.
त्यiच्या मार्गदर्शनाखाली मी पुणे विद्यापिठाचा सुवर्ण पदक विजेता झालो गुरुकृपा काय असते ते मी प्रत्यक्षात पाहीले आणी पाहत आहे माझं खुप भाग्य आहे माझ्यावर कृपादृष्टी गुरूंची आहे हा पुर्ण प्रवास जो काय केला आणी झाला आहे याच सार्थक सवाई गंधर्व भिमसेन महोत्सवा मुळे पूर्ण झाल मला साथसंगतीची संधी पं . संजय गरूड गुरुजींनी दिली मी त्यांचा खुप खुप अभारी आहे.
माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र , जेष्ठ, श्रेष्ठ मंडळींनी येवुन दाद दिली पाठ थोपटली .