पुणे प्रतिनिधी
27/12/ 2023 ता परांडा शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यकारिणी सदस्य निवड तसेच नेहरू युवा केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या शुभे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निगडी येथील शिवभूमी विद्यालय प्राथ विभागात कार्यरत असणाऱ्या आदर्श उपक्रमशील शिक्षिका लेखिका कवयित्री यांची निवड करण्यात आली . सोहळ्यासाठी आसपास चा अनेक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
लोकनेते रामदास खराडे, सौ.रत्नमाला निकाळजे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मा.श्री.नितीन भाऊ बागल साहेब प्रदेश अध्यक्ष डॉ.श्री उमेश देशमुख उपप्रदेश अध्यक्ष मा श्री बळवंत पाटील टाळगावकर प्रदेशाध्यक्ष चांच्या उपस्थितीत "महाराष्ट्र समाजरत्न" पुरस्काराने कोठेकर योगिता यांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात त्यांनी साद केलेल्या " बळीराजा - खरा श्रीमंत" या कवितेने सर्वांची मने जिकंली सर्व स्तरातून त्यांना पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या जात आहे.