पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
किमान समान शिबीरातर्गंत मंगळवार, दिनांक १९ डिसेंबर, २०२३ रोजी पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत येथे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र जोशी, तालुका विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली. दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.एस. पाखले, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरास मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते न्यायाधीश श्रीमती एस.एस.पाखले यांनी उपस्थीत ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती करुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी माहिती दिली. तत्पुर्वी कायदेविषयक शिबीराची प्रस्तावना पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.अर्जुन पाटील यांनी केली, तसेच अॅड. सागर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त व आभार श्री. शशिकांत घाडगे यांनी मानले.
सदर शिबीरास पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अॅड. शशिकांत घाडगे, अॅड. संतोष नाईकनवरे, अॅड सागर गायकवाड, अॅड गणेश चव्हाण, अॅड मंगेश उपासे तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री. के. के. शेख, श्री.ए.सी.कुलकर्णी, श्री, एस.बी.झोळ, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.