पंढरपूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद पंढरपूर यांचे वतीने थोर समाज सुधारक व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नावे तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आ. दत्तात्रय सावंत सर यांच्या हस्ते सुग्रीव काळे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा तात्यासो पाटील यांनी कार्यक्रमासचे अध्यक्षस्थान भूषविले होते. याप्रसंगी सेवापुर्ती निमित्त प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी व महाराष्ट्र सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा ही विशेष सत्कार संपन्न झाला. तर या कार्यक्रमासाठी पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण, प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तात्यासो यादव, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष (टी. डी. एफ.) पांडुरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चेअरमन कल्याणराव काळे,प्राचार्य गुळमे व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.