सोलापूर प्रतिनिधी
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उद्या बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक मराठी, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी प्रशालेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राजराजेश्वरी प्रशालेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांनी रक्तदान करुन गुरुचरणी सेवा समर्पित करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.