पंढरपूर प्रतिनिधी
चंद्रशेखरजी बावनकुळे , विधान परिषद सदस्य हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आज मंदिरात आले होते. त्यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते त्यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला.
यावेळी आ. समाधानजी अवताडे व मा.आ. प्रशांतजी परिचारक तसेच व्यवस्थापक बालाजी पूदलवाड उपस्थित होते.