वर्धा प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रामध्ये सुजाण ,सक्षम व सर्जनशील नागरिक घडविण्यामध्ये कला व सांस्कृतिक कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असे मत उपशिक्षणाधिकारी मा.श्रीमती उषाताई तळवेकर यांनी लोकनेते माजी आमदार प्रा.सुरेशभाऊ देशमुख अमृत महोत्सव कृतज्ञता वर्ष २०२३-२४ अंतर्गत " यशवंत सांस्कृतिक महोत्सव" समारोपिय बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.कु.स्नेहलताई देवतारे नगराध्यक्ष,नगर पंचायत,सेलू. प्रमुख उपस्थिती मा .श्री.मुकुंद मा.श्रीमती वनिता चलाख मुख्याध्यापक यशवंत विद्यालय, केळझर. मा.श्री.मुकुंद गाडेकर लेफ्टनंट,इंडियन आर्मी. मा श्री.मुकुंद नाखले मुख्याध्यापक यशवंत विद्यालय, येळाकेळी. मा.श्रीमती शालिनी भेले मुख्याध्यापक, यशवंत विद्यालय,दहेगाव(गो.) मा.श्री.रवींद्र कोठेकर मुख्याध्यापक, यशवंत विद्यालय,जयपूर. मा.प्रा.डॉ.संदीप काळे प्रभारी प्राचार्य, यशवंत महाविद्यालय,सेलू. मा.श्री.अमित चिनेवार उपप्राचार्य, यशवंत महाविद्यालय, सेलू उपस्थित होते.
यावेळी मा.श्री.समीरभाऊ देशमुख अध्यक्ष,यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था,वर्धा.यांनी कार्यक्रमाच्या भेटी दरम्यान यशवंत सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानून स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रा.डॉ.श्री.संदीप काळे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आयोजना मागची भूमिका व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतातून मा.कू.स्नेहलताई देवतारे यांनी विद्यार्थ्यांचे कलागुणांचे कौतुक करीत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देत इतर सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ममता राऊत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शंतनु खंडागळे यांनी केले.
या सांस्कृतिक महोत्सवामध्ये गितगुंजन व नृत्य स्पर्धा एकल व समूह या प्रकारामध्ये घेण्यात आली होती.या झोनमध्ये सहभागी सर्व शाळेतील स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करीत उपस्थितांचे मन जिंकले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.श्री.सतीश रघुवंशी,प्रा.जयश्री देशमुख,प्रा.रत्नाकर चोरे,प्रा.सोनाली वाजपेयी यांनी परिक्षणाचे कार्य केले.
सांस्कृतिक महोत्सवातील सर्व विजेत्या,उपविजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.गणेश राठोड,प्रा.प्रणिता चाफले,प्रा.कविता बल्ले,प्रा.विशाल वैरागडे,प्रा.वंदना सोमवंशी,प्रा.रुचिका नाईक,प्रा.सुदर्शन भगत व इतर सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला झोनमधील यशवंत विद्यालय केलझर, येळाकेळी,दहेगाव,जयपूर येथील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.