पंढरपूर प्रतिनिधी
उमेशचंद्र खेडकर स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये आपल्या शेळवे कृषि शेळवे या विद्यालयातील कु.काजल राजेंद्र पवार व अनुष्का दादासो पवार यांनी लहान गट 5 वी ते 7 वी या गटामध्ये व चि.शिवतेज आप्पासाहेब भोसले याने 8 वी ते 10 वी या मोठ्या गटामध्ये सहभाग घेतला.
सदर स्पर्धा रविवार दि 17 डिसेंबर 2023 रोजी द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर या ठिकाणी पार पडल्या.सदर स्पर्धेमध्ये मोठ्या गटात 31 व लहान गटात 90विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यामधून शिवतेज भोसले याने तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक गाजरे व शिक्षक विद्यार्थी यांनी शिवतेज चे अभिनंदन केले तसेच त्याच्या पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.