पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळेच राज्यातील 26500 शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तथापि ही योजना लागू होण्यासाठी 2005 पूर्वीपासून निर्माण केलेल्या महाराष्ट्र राज्यशाळा कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा पायी दिंडी, आंदोलन, उपोषण या उपक्रमाद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे,कोकण विभागाचे बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे किशोरजी दराडे,सुधीर तांबे शिक्षक सेनेचे नेते ज. मो.अभ्यंकर यांच्यासह वर्धा ते नागपूर पुणे ते मुंबई असा पायी दिंडी प्रवास करून शासनाचे जुन्या पेन्शन योजनेकडे लक्ष वेधले होते.
अनेक वेळा पुणे,मुंबई, नागपूर येथे आंदोलन करत असताना मुंबईतील आझाद मैदान येथे तीन मे 2023 ते 16 मे 2023 पर्यंत हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत जुन्या पेन्शन साठी आंदोलन केले होते याची दखल घेऊनच चळवळीतील नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व शिक्षक व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे.
"जोपर्यंत विनाअनुदानित शिक्षकांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आमदारकीची पेन्शन घेणार नाही!"असे घोषित केलेल्या दत्तात्रय सावंत यांनी तब्बल 42 महिने पेन्शन घेतली नाही. यापुढेही शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आग्रही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती हा लढा कायम चालू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्राध्यापक गुंड यांनी केले. व्यासपीठावर राज्य संघटक समाधान घाडगे पुणे विभागाचे राजेंद्र आसबे सोलापूर शहरचे शंकर वडणे सेकंडरी स्कूल ऑफ सोसायटीचे संचालक प्रमोद देशमुख,बापू शेंडगे मारुती गायकवाड आदींसह शेकडो शिक्षक बांधव उपस्थित होते.
पत्रकारांच्या वतीने दैनिक सामानाचे प्रतिनिधी सुनील भाऊ उंबरे यांनी सरांच्या कार्यास शुभेच्छा देऊन सहकार्य ठेऊ अशी ग्वाही दिली.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे त्याचा निर्णय मंत्रिमंडळात होऊन तो लवकर पारित करण्यासाठी पाठ पुरा वा सुरू ठेवणार आहे तसेच 2005 नंतरच्या बांधवांसाठी ही लढा उभारणार आहे.
दत्तात्रय सावंत.