भोसरी प्रतिनिधी
भोसरी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या बोपखेल भागात पोलिस चौकी च्या जागेसाठी पाहणी दौरा करण्यात आला.
त्या वेळी बोपखेल मधील भाग्यदेव_एकनाथ_घुले (शांतता कमिटी सदस्य भोसरी पोलीस स्टेशन) हे सातत्याने गेली २०१९ पासुन आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त व इ-प्रभाग अधिकारी यांच्या संपर्कात होते व वेळोवेळी शांतता कमिटी च्या मिटिंग मध्ये पोलीस चौकीची मागणी केली होतो.
पाहणी दौऱ्या दरम्यान गावातील सर्व सविस्तर माहिती. वरिष्ठ पोलीस प्रशासनाला देण्यात आली व नागरिकांशी ही संवाद साधण्यात आला.
भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी म्हणाले आम्ही सदैव बोपखेल मधिल ग्रामस्थ, नागरिकांच्या. सुख दुःखात, नैसर्गिक आपत्ती जनक समयी सदैव तत्पर आहोत अशी भावना गवारे यांनी व्यक्त केली व लवकरच बोपखेल रामनगर गणेशनगर भागात पोलिस चौकी होईल. असे हि सांगण्यात आले.
त्यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे , मारुती मोरे , संतोष गायकवाड ( शांतता कमिटी सदस्य) , दत्तात्रय (बाळु) घुले (शांतता कमिटी सदस्य) , दत्ता भाऊ घुले , रोहिदास जोशी , दिनेश लोंढे उपस्थित होते.