पंढरपूर प्रतिनिधी
सन 2023 यावर्षी कार्तिकी एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 8 ते 10 लाभ वारकरी भाविक येतात. या भाविकांना आरोग्य विषयक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पत्राशेड, गोपाळपूर रोड, पंढरपूर येथे दि.21/11/2023 ते दि.23/11/2023 या कालावधीत मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा) पाटील पालकमंत्री सोलापूर जिल्हा, समर्थ युवा फाऊंडेशन पुणे, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर तसेच कैवल्य वेलफेअर फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, त्याचा सर्व वारकरी भाविक, सेवेसाठी आलेले अधिकारी – कर्मचारी – स्वयंसेवक व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या सदस्या तथा कैवल्य वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.माधवी निगडे यांनी केले आहे.
याशिबीरामध्ये रक्तातील साखर (Blood Shugar), छातीचा एक्स-रे, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब (Blood Pressure), रक्त तपासणी (CBC Test), स्तन कॅन्सर (Memography) इत्यादी सर्व चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. वैद्यकीय सल्लयानुसार वय वर्षे 40 च्या पुढील वयोगटातील प्रत्येक स्त्रियांसाठी स्तन कॅन्सर (Memography) ही चाचणी करणे आवश्यक आहे. कारण, दरवर्षी 1 लाख 60 हजार स्त्रियांना स्तन कॅन्सर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदरच्या चाचण्या करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व अत्याधुनिक पध्दतीची मेडिकल चेकअप मोबाईल व्हॅन असणार आहे. त्यासाठी श्री.मोहन औसेकर (मो. 99225 31800) व श्री.राहूल गावडे (मो. 96044 04006) यांचेकडे नाव नोंदणी करून सदर शिबिराचा लाभ घ्यावा.