मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक सेवक समिती या संघटनेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
संघटनेचे राज्याध्यक्ष जयवंत हक्के, राज्य सचिव संतोष कुमार घोडके, पुणे विभागीय अध्यक्ष प्रकाश कोळी ,सोलापूर जिल्हाध्यक्ष मनोज साळुंखे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष परशुराम घाटगे, राज्य उपाध्यक्ष विश्वास गजेवार ,मराठवाडा प्रमुख रमेश अवचार, धाराशिव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आवारे, माधव देवकर ,बाळकृष्ण लाड, यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
यावेळी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, महिला आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ इत्यादी उपस्थित होते.