पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील आमदार समाधान दादा आवताडे यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. समाजामध्ये आपणही वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणे लागतं या उद्देशाने आज पंढरपूर तालुक्यातील बोहाळी या गावांमधील प्रतिष्ठित नागरिकांनी व समाधान दादा आवताडे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी आपणही काहीतरी देणे लागतो या उद्देशाने पालवी प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित येथे जीवनाशक वस्तू देऊन मायेची पालवी आपुलकीची माणुसकी दाखवत हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बोहाळी सरपंच शिवाजी पवार , उपसरपंच जगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव कल्याण कुसूमडे पोपट गायकवाड ज्ञानेश्वर जाधव उमेश भोसले उत्तम शेंडगे बंडू हजारे सुनिल जाधव राजेंद्र जाधव अशोक काळे प्रथमेश बागल आबा पाटील किशोर जाधव सौरभ रणदिवे अभिजीत मोरे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते