सातारा प्रतिनिधी
"महा अधिवेशन" गुमानपंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य दिनांक 2 व 3 मार्च या दिवशी होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी व त्याची माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी श्री ह भ प बगाडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व श्री अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राज्य महाराष्ट्र, जिल्हा सातारा जिल्हा प्रमुख व मंडळाचे अध्यक्ष श्री संजय हिरवे यांच्या उपस्थित पार पडला.
तसेच महासंघाचे सचिव महादेव खटावकर जयसिंगपूर, पांडुरंग दाभोळे,प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,मंगेश खटावकर पाटण तालुका अध्यक्ष व बहुसंख्येने उपस्थित असलेले समाज बांधव पाटण मल्हार पेठ मोरगिरी पेठ शिवापूर येथील सर्व मोरणा भागातील सर्व समाजातील समाज बांधव व सर्व कार्यकर्तेउपस्थित त्यांना मार्गदर्शन व माहिती दिली बगाडे महाराज यांनी श्री संत नामदेव महाराजांच्या विषयी अनेक गोष्टीचा व मानव जातीचा संदेश सर्वधर्मसमभाव व किर्तन रचनेची पताका निर्माण करून पंजाब गुमान पर्यंत धर्माची पथका उंचावत नेण्याचं काम श्री संत नामदेव महाराजांनी केले अनेक संतांच्या बरोबर भक्ती मार्गाचं जाळविण्याचे काम केले अनेक विषय नामदेव महाराजांच्या विषयी सांगण्यात आले.
श्री मंडळाचे अध्यक्ष संजय हिरवे यांनी त्यांचे स्वागत शाल श्रीफळ व आभार व्यक्त करून गुमान येथे महा अधिवेशनासाठी जाण्यासाठी लोकांना तयारी करणे विषयी आव्हान केले व आभार नंतर कार्यक्रम चहापाना नंतर कार्यक्रम संपवण्यात आला.