बारामती प्रतिनिधी
कार्तिकी वारी दिंडी चालक ह भ प श्री आप्पासो वनवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख श्री राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वै परम पूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज कार्तिकी पायी वारी गाव लाकडी ते पंढरपूर पायी वारी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरामध्ये श्री साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. भिलारे एमडी मेडिसिन डॉ. शिंगटे डॉ. शुभम शहा व डॉ. अनिल जडे यांनी पेशंटची मोफत तपासणी करून मोफत औषधे वाटप केली.
या संपूर्ण शिबिराचे आयोजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश महादेव गावडे व बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ ,साई सेवा हॉस्पिटलचे अनिकेत लोखंडे व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी डॉक्टरांना मदत केली व पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना साई सेवा हॉस्पिटल सोमेश्वर यांच्यातर्फे ॲम्बुलन्स ची सोय केली होती.