पनवेल प्रतिनिधी
दि.२२ नोव्हेंबर २०२३.आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तथा पदवीधर प्रकोष्ठ, भाजपा, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक श्री.धनराजजी विसपुते यांचा ५५ वा वाढदिवस.या निमित्ताने आज दोन सत्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१.सत्र पहिले- उमेद
पहिल्या सत्रात स्वामी नारायण मंदिर , दादर चे प.पू. अभयस्वरूप महाराज आणि प.पू.प्रसन्न महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य अशा श्री.दादासाहेब धनराजजी विसपुते सभागृह(Auditorium) चे उदघाटन करण्यात आले. या वेळी नामफलकाचे अनावरण , दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजना नंतर प.पू. प्रसन्न महाराज आणि प.पू.अभयस्वरूप महाराज यांनी उपस्थित सर्वांना आपल्या पवित्र वाणींतून सखोल मार्गदर्शन करत एक नवी दिशा दाखवली.....अत्यंत आध्यत्मिक वातावरणात सर्वांना मार्ग दाखवत त्यांनी विसपुते दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
२. द्वितीय सत्र - रेशीमगाठी
द्वितीय सत्रात विविध विभागांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने नव्या सभागृहात अत्यंत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. या नंतर डॉ. सीमा कांबळे यांच्या "रेशीमगाठी" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने श्री.धनराजजी विसपुते व सौ. संगीताजी विसपुते यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. केक कटिंग करत सर्वांनीच त्यांच्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला. खास कार्यक्रमासाठी अमेरिकेहून आलेले मा.श्री.चित्रे साहेब यांनी सर्वांना सायबर सिक्युरिटी वर मार्गदर्शन केले आणि आती रहेंगी बहारे..या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.