सिंहगड महाविद्यालयात "सदैव सकारात्मक जीवन" या विषयावर १ दिवसीय फ़ॅकलटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे आयोजन
सोलापूर प्रतिनिधी
सकारात्मक शिक्षक म्हणजे सकारात्मक समाज होय. शिक्षकी पेशामध्ये सदैव सकारात्मक राहणे हे आव्हानात्मक असले तरी अत्यंत गरजेचे आहे, खरा शिक्षक हा कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय, अपेक्षेशिवाय काम करत असतो, फक्त उपजीविकेसाठी काम करणारा शिक्षक समाज व देशासाठी उपयुक्त ठरत नाही त्यामुळे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांत सकारात्मकता रुजवायला हवी असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्ते तथा 'लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह' फौंडेशन चे संस्थापक डिक पाराशीनी(दुबई, यूएई) यांनी केले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव येथील जनरल सायन्स व इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्रसंगी डिक पाराशीनी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य. डॉ. शंकर नवले, सीआरटीडी चे डायरेक्टर व माजी कुलगुरू डॉ.एस. एच. पवार, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रवींद्र देशमुख उपस्थित होते.
यावेळी सुजाण पालकत्व, शिक्षकाची भूमिका, विद्यार्थ्यांना हाताळताना उद्भवणारे प्रश्न, आरोग्य, कामाच्या ताणाचे नियोजन, परिवार व काम यांची योग्य सांगड कशी घालावी आशा शिक्षकांच्या विविध प्रश्नांना पाराशीनी यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. विनोद खरात यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला शिक्षकांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केले जात असल्याचे विशद केले. या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रा. रवींद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.