उदय वाघवणकर - जोगेश्वरी प्रतिनिधी
अंधेरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शरद नामदेव बनसोडे यांना मुंबईतील भगवे वादळ साप्ताहिकाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शरद बनसोडे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार, तसेच भवतु सब मंगलम मुंबई यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने तिहेरी संगम हॅट्रिक करणारे शरद नामदेव बनसोडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून शरद बनसोडे या कार्यकर्त्यास महात्मा गांधी पुरस्कार, शाहीर आण्णासाहेब साठे पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार ,पत्ररत्न, पत्रभूषण ,साहित्यरत्न, आदी २०० पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.