मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
सध्याची तरूण पिढी मोबाईल व टि.व्ही. च्या कार्यक्रमात गुरफटलेली असून संत साहीत्य व लोक साहीत्य कलेकडे या नवीन पिढीचे दुर्लक्ष होत आहे. नेमकी हीच सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर यांचे संयुक्त विद्यमाने नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. संजय नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहूरूपी भारूड कार्यक्रमाचे दि. २२ नोव्हेंबर २०२३, सायंकाळी ५.३० ते ८.३० वा. गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे मोफत आयोजन केले आहे असे ना.स.प. पुणे शहर शाखेचे चे अध्यक्ष संदिप लचके यांनी सांगितले
डाॅ. रामचंद्र देखणे यांच्या देशविदेशात गाजलेल्या संत विरचित भारूड कार्यक्रमाचा पहिलाच पुन:आरंभ डाॅ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तूत "बहूरूपी भारूड" सादरकर्ते डाॅ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचेसह उच्च विद्याविभूषित ३५ कलाकारांचा संच असून या बहूरूपी भारूड कार्यक्रमाच्या माहिती पत्रकाचे पूजन दिपावलीच्या पूर्वसंध्येला बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पेशवेकालीन खंडोबा मंदिर शिंपी आळी, कसबा पेठ, पुणे येथे डाॅ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, सहसचिव रोहित यवतकर, ना.स.प.पुणे शहर शाखेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष रणजित माळवदे, सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष कुंदन गोरटे, उपाध्यक्ष सोमनाथ मेटे, उपाध्यक्ष सुभाष पांढरकामे, उपाध्यक्ष अक्षय मांढरे, खजिनदार विजय कालेकर, सहसचिव राहुल सुपेकर, प्रदिप खोले, शिवाजी माळवदकर, मनोज बारटक्के, अक्षय लचके, रोहित माळवदकर, संतोष लचके, सौ. गायत्री लचके, सौ. शोभा मुळे, सौ. विजया कालेकर, सौ. रूपा माळवदकर, सौ. राधिका सुपेकर, सौ. यवतकर, सौ. रूचा लचके व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
ना.स.प. पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. अशी माहिती ना.स.प. पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली