सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय उष्णकटीबंधीय हवामान शास्त्र संस्थेमार्फत 'निबंध स्पर्धा' आयोजित करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी भारतीय उष्णकटीबंधीय हवामान शास्त्र संस्थेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.थारा प्रभाकरन मॅडम, शास्त्रज्ञ डॉ. शिवसाई दिक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे व डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. सुवर्णा क्षिरसागर, डॉ. दत्तात्रय गंधमल उपस्थित होते.
याप्रसंगी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये मिळवलेले यश व महाविद्यालयात राबिवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती सांगितली व तसेच यावेळी डॉ.थारा प्रभाकरन आणि डॉ.शिवसाई दिक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रावणी नवले, द्वितीय क्रमांक तेजा शेवाळे, तृतीय क्रमांक भार्गव कटकम व लया कोकुळ यांनी पटकाविला.
या निबंध स्पर्धेमध्ये एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता दूधभाते व सरस्वती साळुंखे यांनी केले.