पुणे प्रतिनिधी सागरराज बोदगिरे
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई)' यांचे आयुष्य, कार्य आणि विचार बहुसंख्य लोकांपर्यंत कसे पोहोचविता येईल याचा विचार करून त्यांची वास्तू आणि वस्तू जतन करून आम्ही नुकतेच त्याचे एक छोटे संग्रहालय केले आहे.आणि याच दिवशी बालदिन आणि दिवाळी पाडवा असा त्रिवेणी योग जुळून आला आहे हे औचित्य साधून 'सन्मती बाल निकेतन' संस्थेतील 'माई निवास'या वास्तुचे उद्घाटन- मा. श्री. शिवकुमार डिगे न्यायाधीश मुंबई हायकोर्ट, मुंबई यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
*अध्यक्ष- मा. श्री. अशोक (आबा) खाडे उद्योजक*
*प्रमुख पाहुणे- मा. श्री. जसविंदर नारंग सीईओ - बिलू पूनावाला फाऊंडेश*
या शुभप्रसंगी आपणही उपस्थित राहावे आणि आपले माईशी, माईच्या कार्याशी, माईच्या लेकरांशी असणारे ऋणानुबंध वृद्धींगत व्हावेत अशी मनापासून ईच्छा आहे...आपण माईंना भरभरून प्रेम दिलत, आता आम्हा लेकरांना त्याची गरज आहे.आपले आशीर्वाद रुपी पाठबळ आमच्यासाठी घेऊन या......माई आई झाल्या तुम्ही गणगोत व्हा !....या... आणि आमच्या आनंदात सहभागी व्हा !.....
*दिनांक- १४ नोव्हेंबर २०२३ माईची अमृत महोत्सवी जयंती..*
*वेळ- सकाळी ९:००*
*स्थळ- सन्मती बाल निकेतन, वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट जवळ, बेल्हेकर वस्ती, मांजरी बु. ॥ पुणे - ४१२३०७*
यावेळी सन्माननीय उपस्थिती
*मा. श्री. डॉ. दिलीप मुरकुटे. संस्थापक बार नागरी पतसंस्था मर्यादित, बाणेर*
*मा. श्री. प्रसाद लोणारे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन, पुणे*
*मा.श्री. सागर पेडगीलवार सेल्स अँड मार्केटिंग, पेडगीलवार कॉर्पोरेशन*
*मा. श्री. अनिल महादेव जगताप उप प्राचार्य ए एम कॉलेज*
*मा. श्री. अॅड. ज्ञानेश शहा सल्लागार, 'सप्तसिंधू'*
*मा. श्री. डॉ. दिलीप माने, मॅनेजिंग डिरेक्टर नोबल हॉस्पिटल*
*मा. श्री. रविंद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर*
*मा. सौ. वृषाली रणधीर प्राचार्या नेस वाडिया कॉलेज*
*मा. श्री. संजय जयसिंग मोहिते प्राचार्य के के पुले विद्यालय*
*मा.श्री. राहुल सावंत सौ. एस. आर. कटफळ*
विनीत :-ममता सिंधुताई सपकाळ आणि माई परिवार (अध्यक्षा- सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन आणि शिक्षण संस्था, पुणे.)