पनवेल प्रतिनिधी
श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाच्या माध्यमातून नवीन प्रवेशित बी.एड व एम.एड.विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये बी.एड. व एम.एड. २०२२ -२४ विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ.नीलिमा किणगे,प्राचार्य, हबीब एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे लेट खतिजा कॉलेज ऑफ एज्युकेशन, मुंब्रा,तर विशेष अतिथी म्हणून श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनचे विविध क्षेत्रात यश मिळवलेले माजी विद्यार्थी मा. श्री. डॉ.सुभाष भोपी(डॉक्टरेट पदवी पूर्ण केली),मा.श्री. डॉ. प्रशांत पाटील (डॉक्टरेट पदवी पूर्ण केली),मा.श्रीम. प्रियांका पाटील( ईब्रू पुस्तकाच्या लेखिका), मा. श्रीम.सायली वडवळकर (प्राचार्य,), मा. श्री. बायजू मॅथ्यू (नेट qualified ), आदर्श शिक्षण समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते,श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे, बी.एड.व एम.एड.चे सर्व प्राध्यापक, बी.एड.,एम.एड द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि नवीन वर्षाचे बी.एड.व एम.एड.चे विद्यार्थी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.२६/११/ मध्ये शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली, त्याचबरोबर संविधान दिनानिमित्त प्रा.अनिल गुरव यांच्या मागून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.प्रा. विनायक लोहार यांनी कार्यक्रमाचा उद्देश्य आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट केला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची माहिती प्रा .प्रितेश वाढे यांनी दिली. या स्वागत समारंभाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रात यशस्वी झालेले महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशामध्ये महाविद्यालयाचे महत्त्वाचे योगदान आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.डॉ निलिमा किणगे यांनी बी.एड. व एम.एड.अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली आणि माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रस्तुत कार्यक्रमात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थाने संविधानाबाबत माहिती सांगितली. प्राचार्य मा.डॉ. सीमा कांबळे यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश आणि महाविद्यालयामध्ये राबवण्यात आलेले नवनवीन उपक्रमांबद्दल माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आदर्श शिक्षण समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी आपल्या संस्थेची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करून विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमासाठी प्रेरणा दिली.प्रा. नेहा म्हात्रे यांनी सर्व उपस्थित अतिथींचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अमिना शेख, प्रा.अनिल गुरव, प्रा.मनीषा सुतार, श्रीम. परिमला कारंजकर, श्री.राकेश कांबळे, श्री.योगेश ठोकळ,श्रीम.कृतिका खारकर, श्रीम.प्रिया सगरे, श्रीम.नीलम कदम, श्रीम.शिवांजली, श्री.संजय कांबळे, श्री.महेश या सर्वांनी परिश्रम घेतले.
अशा पद्धतीने महाविद्यालयातर्फे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून भविष्यासाठी शुभेच्छा देऊन मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.