होळकर वस्ती शेतकरी राजांना न्याय न मिळाल्यास पुन्हा चार डिसेंबर पासून साखळी उपोषणास बसणार असा. ॲड.कांचनकन्होजाताई खरात यांचा इशारा
फलटण प्रतिनिधी
आळंदी पंढरपूर या नव्याने तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील चौधरवाडी हे गाव लागते.या गावातील होळकर वस्ती सर्वे नं३६ व३६ब ला सर्वीस रोड मिळावा यासाठी ३० ऑक्टोंबर २०२३ पासुन होळकर वस्ती येथील शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते.सलग १२ दिवस याठिकाणी उपोषण चालू होते.प्रांताधिकारी यांनी साखळी उपोषण स्थळी भेट देवून शेतकऱ्यांचे म्हणूने ऐकून घेतले.त्यावर काय पर्याय निघतोय यासाठी ते प्रयत्न करत आहेत.आर के चव्हाण ग्रुपच्या प्रोजेक्ट मॅनेजर ने होळकर वस्ती चौधरवाडी याठिकाणीचा चालू असलेला रोड जोपर्यंत पर्यायी मार्ग होत नाही तोपर्यंत बंद राहणार नाही असे लेखी पत्र काल दि.०९/११/२०२३ प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे.तसे तोंडी सांगण्यात आले की, रहदारीच्या रोडवर कोणतेही काम करणार नाही आणि लवकरात लवकर पर्यायी मार्ग तयार करू यामुळे १२ दिवस चाललेले साखळी उपोषण आज स्थगित करण्यात आले असुन ३/१२/२०२३ पर्यंत यावर योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी पुन्हा ०४/१२/२०२३ पासून साखळी उपोषणाला बसणार आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दोनवेळा या शेतकऱ्यांच्या बाजूच्या चाललेल्या मराठा आरक्षण उपोषण स्थळी भेट देतात पण आमच्या साखळी उपोषण कडे पाठ फिरवतात अशी खंत शेतकऱ्यांनी उपोषण सोडतेवळी बोलुन दाखवली,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी ज्यावेळेला तेव्हा चालू मराठा आरक्षणाला भेट देवून झाल्यावर येथेच शेजारी सुरू असलेल्या चौधरवाडी शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेट दिली आहे मात्र त्यांनीही या शेतकऱ्यांच्या उपोषणावर काय दखल घेतली हे समजू शकले नाही.
पर्यायी मार्ग मिळावा यासाठी १२ दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणात खालील शेतकरी सहभागी होते, भगवान होळकर,नवनाथ करचे, नाना खांडेकर, युसुफ शेख,बापू होळकर,बाळू खांडेकर, महादेव होळकर,प्रदिप होळकर,मोनाली होळकर,शोभा होळकर, अर्चना होळकर,किरण होळकर,राखी होळकर,प्रकाश भोसले,सुरेखा भोसले,अक्षय करचे,छबुबाई करचे, संतोष होळकर, मंगेश होळकर, अमित करचे,मंगल होळकर यासोबत ॲड.कांचनकन्होजाताई खरात याही साखळी उपोषणात सहभागी होत्या.