भाळवणी प्रतिनिधी
मेट्रोब्रेन अबॅकस संचलित ७वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी आळंदी या ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेत भाळवणी येथील सुखकर्ता अबॅकस सेंटरचे उज्ज्वल यश.
या स्पर्धेत राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सुखकर्ता अबॅकस सेंटरचे एकोणीस विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यामधील एक विद्यार्थी C4 Category कु.वैष्णवी पुरुषोत्तम निराळी 2nd Topper तर दोन विद्यार्थी1).तनिष्क संभाजी रोकडे. B3 Category 2).शिवानी बाळासो कारंडे C4 Category मध्ये 3rd Topper ठरले, सात विद्यार्थ्यांनी 4th rank मिळवला,
सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षेेत चांगले गुण प्राप्त करून उज्ज्वल यश मिळविले आहे. सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, ट्रॉफी व सर्टीफिकेट मिळाले.
विद्यार्थ्यांची नावे सम्रद्धी केसकर, अर्पिता केसकर,आदिती खरडकर, राजनंदिनी कौलगे,राजवीर बंडगर,श्रेयस निराळी,विश्वजीत बंडगर,रिया शिंदे,मृदुला विभुते,ईश्वरी कारंडे,यश माने,सौरभ गवळी,रोहन शिंदे,आर्यन बिडवे,निरंजन कांबळे,अभिषेक कारंडे यांना सुखकर्ता अबॅकस सेंटरच्या संचालिका मनिषा कथले यांचे मार्गदर्शन लाभले, यांनाही टीचर अबॅकस ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.
या सर्वांचे अभिनंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मेट्रो ब्रेन अबॅकस चे संस्थापक संतोष लोहारे यांनी केले व विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.