बारामती प्रतिनिधी
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
ह.भ.प. आप्पासो विठ्ठल वनवे महाराज यांच्या पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.तसेच दिं.1711.2023.ते.24.11.2023 पर्यंत कार्तिक वारी बारामती ते पंढरपूर पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ते पंढरपूर कार्तिकी वारी साठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या. संपूर्ण शिबिराचे आयोजन व नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब रुग्णांना रात्री अप रात्री मदत करणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे यांनी केले होते.
या महाआरोग्य शिबिरासाठी बारामती ते पंढरपूर पर्यंत मोफत ऍम्ब्युलन्स दिली ते बारामतीचे वैभव नेहमी गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणारे बारामती भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग कचरे त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच बारामती ते पंढरपूर महारोगे शिबिरासाठी अंबुलन्स चे पूजन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड. गुलाब गावडे पाटील व त्यांच्या सौ ताई , डॉ.बाळासाहेब आटोळे व नेहमी गोरगरीब जनतेला माहितीच्या अधिकारातून न्याय देणारे आमचे मित्र पोपट धवडे,डॉ अनिल जडे सतीश गावडे हजर होते.या.शिबिरांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.या महाआरोग्य शिबिरासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटल.बारामतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनीही वारकऱ्यांसाठी औषधाची सोय केली होती.तसेच या शिबिरामध्ये मोफत शुद्ध बिसलेरीचे बॉटल वाटप वारकऱ्यांना केले होते.
या शिबिरांमध्ये सोमेश्वर येथील साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. विद्यानंद भिलारे एमडी मेडिसिन ,डॉ. जयश्री भिलारे , डॉ. शिंगटे , डॉ. निता शिंगटे, डॉ. अनिल जडे. डॉ शरयु वासकर , महेश चिवटे जिल्हा प्रमुख शिवसेना करमाळा, मनीषा वासकर पंढरपूर शिवसेना तालुका समन्वयक , नरसिंह चिवटे , नागेश चेडंगे शिवसेना सहायक करमाळा व बारामती तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी व सतीश गावडे व. श्रेयश भोसले शिवसेना वैद्यकीय सहाय्यक बारामती यांनी डॉक्टरांना खूप मदत केली या शिबिरासाठी पंढरपूर येथे जात असताना जंक्शन येथील पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विक्रम साळुंखे यांनीही शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण शिबिरामध्ये 2300 वारकऱ्यांनी लाभ घेतला.