पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचे लोन आता शहराच्या ग्रामीण भागातही पोहोचले असून साखळी उपोषणे उपोषणे कार्यक्रम चालू आहेत याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील मराठा समाजातील युवकांनी साखळी उपोषण चालू केले आहे.
मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे याकरता देगाव येथील बापूराव घाडगे विलास शिंदे सोमनाथ जाधव बालाजी घाडगे रामा गधाडे विठ्ठल चव्हाण गणेश कदम नितीन घाडगे रोहित रंधवे बबलू कदम प्रवीण शिंदे संदीप घाडगे या युवकांनी आपल्या रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना पाठवले आहेत याची दखल न घेतल्यास 1 नोव्हेंबर ते 20 रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही पाठवलेल्या निवेदनात केला आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता गावोगावी साखळी उपोषणे नेत्यांना गावबंदी अधिक कार्यक्रम चालू आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात उपोषण साखळी, धरणे अधिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.