सोलापूर प्रतिनिधी
यामधील हकीकत अशी की सोलापूर,नीलम नगर येथील सोन्याचे दुकान फोडल्या प्रकरणी संशयित आरोपींना MIDC पोलिसांनी १५/१०/२३ रोजी अटक केली होती.व यातील
आरोपींना दि.१६/१०/२३ रोजी सोलापूर येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने या आरोपींना २०/१०/२३पर्यंत ची पोलीस कोठडी दिली होती.
परंतू दि.२०/१०/२०२३ रोजी पुन्हा जेव्हा आरोपींना मे कोर्टात हजर केले असता एम. आय. डी. सी. पोलिसांनी यामधील आरोपींना पुढील चौकशी कामी आरोपींची वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती.
परंतु यामध्ये आरोपीच्या वकिलांनी वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा जोरदार युक्तिवाद केला व आपले म्हणणे में कोर्टास पटवून सांगितले त्याप्रमाणे मे न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली
यात आरोपी तर्फे ॲड. सौरभ जगताप, ॲड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.