सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शहरस्तर मैदानी स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम च्या श्रावणी भोसले हिने सुवर्णपदक पटकावले.
एस.आर.पी.कॅम्प येथे पार पडलेल्या शहरस्तर मैदानी स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये दोनशे मीटर धावणे या प्रकारात श्रावणी भोसले हिने सुवर्णपदक पटकावले व हिची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सुयशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर,श्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे, श्री. मल्लिकार्जुन कळके व समन्वयक श्री संतोष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.