पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींचा चपला मारून निषेध करण्यात आला
मागील काळात शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरती पद्धत सुरू करून महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या कष्टाने शहरामध्ये राहून अभ्यास करून परीक्षा पास होऊन सरकारी नोकरी लागावी म्हणून वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य पोरांचे मनसुबे उधळण्याचे महापाप केलेलं होतं. परंतु आपले पाप झाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी व देवेंद्रजी फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी कंत्राटी भरती भाजपाच्या काळात झाली. अशा वावड्या उठवल्या जात होत्या काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पत्रकार परिषद घेऊन व तत्कालीन जीआर दाखवून यांचा पर्दाफाश केला होता आज संपूर्ण राज्यभर भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोटोला चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला व तरुणांचा कर्दनकाळ शरद पवार शरद पवार महाभकास आघाडीचा जाहीर निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर जिल्हा उपाध्यक्ष प्रा सुभाष मस्के तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे संदिप मान लाला पानकर अक्षय वाडकर बादलसिह ठाकूर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे धिरज म्हमाणे भाऊ हर्शल कदम याचे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.