शेळवे प्रतिनिधी
विज्ञान विषयाच्या संकल्पना अधिकपणे स्पष्ट होण्यासाठी प्रयोग हे एकमेव साधन असून वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक साहित्याची गरज असते, ज्या शाळेची प्रयोगशाळा आणि ग्रंथालय समृद्ध असते त्या शाळेतील मुलं ही तितकीच ज्ञानाने समृद्ध असतात.
आणि म्हणूनच शाळेने ग्रंथालय तर समृद्ध केलेच आहे,प्रयोगशाळा ही अनेक साहित्याने सुसज्ज होतीच दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शन भरवून विध्यार्थ्यांच्या प्रयोगाशीलतेला चालना दिली जाते.
यावर्षी प्रशालेने त्याच साहित्यामध्ये नवीन २५ हजार रुपयांची नविन प्रयोगासाठी आवश्यक उपकरणे सामील करून विध्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.
सदर साहित्याचे प्रशालेमध्ये आज उदघाटन करण्यात आले प्रसंगी खेड भाळवणी चे युवा नेते सागर साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,सदर कार्यक्रमात विध्यार्थ्यांना सर्व साहित्यांची ओळख करून देऊन कोणत्या प्रयोगासाठी कोणती उपकरणे वापरावीत याची सविस्तर माहिती देण्यात आली.