पुरोगामी विचार मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कराड प्रतिनिधी
दलित महिलांबद्दल अश्लील आणि चुकीचे वक्तव्य करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील त्या इसमावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा,विनयभंग आणि चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आले आहे.
निवेदनातील माहिती अशी, लातूर जिल्ह्यातील एका समाजकंटकाने दलित आणि अल्पसंख्याक महिलांबद्दल चुकीचे वक्तव्य केले असून ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया वरती व्हायरल केली आहे. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या आहेत. अशा चितावणीखोर आणि अपशब्द मुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन जंगेही घडू शकतात. त्याची खबरदारी घेऊन संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई करावी. म्हणजे सामाजिक स्वास्थ्य राहील असे निवेदन नमूद करून संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावरती सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी चितावणीखोर वक्तव्य करणे, जातीय द्वेषातुन अपशब्द वापरणे, महिलांचा विनयभंग च्या दृष्टीने वक्तव्य करणे या गोष्टीचा विचार करून चितावणीखोर वक्तव्य, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि विनयभंगासारखे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राच्या वतीने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष विश्वास मोहिते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका उपप्रमुख राजेंद्र कांबळे, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे पाटण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण सावंत, अनिल चिकोडीकर,प्रमोद सकटे सह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.