पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध होऊन सेना-भाजप युतीचे अर्थात एकनाथ शिंदे गटाचे संजय देविदास साठे यांची सरपंचपदी तर भाजपा परिचारक गटाचे महादेव पवार यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सेना भाजपा युतीची सत्ता येऊन पहिल्या वर्षी परिचारक गटाचे सौ वाळके यांची सरपंच म्हणून तर तर एकनाथ शिंदे गटाचे संजय साठे यांची उपसरपंच म्हणून म्हणून निवड करण्यात आली होती.
वाळके यांची सरपंच पदी निवड करताना उमेश परिचारक व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिंदे गटाचे जिल्ह्याचे प्रमुख प्रमुख महेश नाना साठे यांना प्रथम सरपंचाची एक वर्षाची मुदत संपताच संजय साठे यांची सरपंचपदी निवड केली जाईल असे ठरले होते. शुक्रवारी सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या.
लक्ष्मी टाकळीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल संजय साठे यांचा सत्कार मिलिंद देवल तसेच ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी केला.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यद चाचा उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंचपदी विराजमान झालेले संजय साठे यांनी सांगितले आपण सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करण्यात येतील तसेच येत्या तीन ते चार महिन्यात लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही नगरपंचायत करण्यात येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे सांगितले.