श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पंढरीचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अनमोल योगदान
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित श्री. रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात पाचवे पुष्प ख्यातनाम गायक विनायक हेगडे आणि गायिका सानिया पाटणकर यांनी गुंफले.
सुरुवातीला सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सदस्या गायिका सानिया पाटणकर गायक विनायक हेगडे अभिजीत बारटक्के सतीश भट ज्ञानेश्वर दुधाणे वैभव जोशी यांच्या शुभहस्ते विठुरायाचे प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रजनन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी देत दोघांनी राग दुर्गा मधील बंदीश आणि विनायक हेगडे यांनी राग जोगकंस मधील बंदीश सादर करत शास्त्रीय संगीताचं हा मुळ पाया आहे.याची जाणीव करून दिली. त्यानंतर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी,रुप पाहता लोचनी,बाजे रे मुरलीया बाजे,युवती मना,माझे जीवन गाणे,जय दुर्गे दुर्गती भवानी,आता कोठे धावे मन, नारायणा रमा रमना,,तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अबीर गुलाल उधळीत रंग,आदी भिमसेन जोशी यांनी अजरामर केलेले अभंग गाऊन शास्त्रीय सरगमच्या भैरवीने गायनाची सांगता केली.त्यांना अप्रतिम साजेशी साथसंगत तबला अभिजित बारटक्के, हार्मोनियम सतीश भट पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ वैभव जोशी स्वरसाथ वेदवती परांजपे, सोमनाथ काशीद, तानपुरा गोपाळ अभंगराव,यांनी केली.सर्व कार्यक्रमाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिक भरभरून प्रतिसाद देत आहेत.
त्यामुळे कलाकारांना ही आपली कला सादर करण्यासाठी आनंद मिळत आहे.आभार विक्रम बिस्किटे सर यांनी केले तर ध्वनीव्यवस्था आरती स्पिकर भैय्या मनमाडकर यांनी केली.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सुधीर घोडके आणि सर्व कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.
फोटो सौजन्य राहुल गोडसे सतिश चव्हाण मंदिर समिती पंढरपूर