शेळवे प्रतिनिधी
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शेळवे येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत, आज उपोषणस्थळी शेळवे गावातील सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी येऊन मराठा समाजास खंबीरपणे पाठिंबा दर्शिवला असून,मराठा समाज आमचा मोठा भाऊ असून तो आमच्या प्रत्येक सुखदुःखात सामील आहे.
त्यामुळे आज आम्ही सर्व बारा बलुतेदार सर्व जातीय; सर्व धर्मीय लोक मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस पाठिंबा देत आहोत,या पुढं मराठा बांधव म्हणतील तेथे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असं ही वक्तव्य यानिमित्ताने समाज बांधवांनी केलं..!!
मराठेतर समाजाने पाठिंबा दिल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले,असंच चित्र गावोगावी असून मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोण आडकाठी घालतय हे हळूहळू सर्वांसमोर स्पष्ट होऊ लागलं आहे...!!