रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाची वाढतेय रंगत रसिकश्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात चौथ्या दिवसाचे ताल आणि स्वरांच पुष्प पं.सत्यजीत तळवलकर आणि सायली सत्यजीत तळवलकर मुंबई यांनी अतिशय सुंदररित्या गुंफले.
सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सत्यजीत तळवलकर,सायली तळवलकर, आशय कुलकर्णी यश खडके,यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम गायिका सायली तळवलकर यांनी सुरुवातीला राग केदार गाऊन अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवाणी देत पंढरपूरीचा निळा लावण्याचा पुतळा,आता कोठे धावे मन,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,आदी अभंगरचना सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण करुन रसिक श्रोत्यांना तल्लीन केले.त्यांना तितकीच दमदार आणि समर्पक तबलासाथ आशय कुलकर्णी, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम यश खडके,टाळ अक्षय तळेकर यांनी केली.त्यानंतर द्वितीय सत्रात तालयोगी पद्मश्री पं.सुरेशजी तळवलकर यांचे सुपुत्र आणि शिष्य सत्यजीत तळवलकर यांच्या दमदार तबलावादनाला सुरुवात झाली.त्यामध्ये तिनतालात तिश्र,खंड,जातीचे पेशकार,कायदे,रेले,मोहरे,
चक्रदार,कमाली चक्रदार,परणे,लग्गीनाडा आदी कमाल तयारीचा हात,बोलांची स्पष्टता, दमदार पढंत यांनी वातावरणात उत्साहवर्धक बदल तबलावादनातून जाणवला,त्यांना तितकीच सुंदर साजेशी लहरा साथसंगत यश खडके यांनी अप्रतिम केली.तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद देत उपस्थिती दर्शविली होती.पुढील चारही दिवस असेच उपस्थितीत राहुन संगीत मोहत्सवाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे, ध्वनी व्यवस्था -आरती स्पीकर भैय्या मनमाडकर यांनी सुंदर केली.सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.
फोटो सौजन्य - राहुल गोडसे सतिश चव्हाण मंदिर समिती पंढरपूर