उद्या संतमी माळदिवशी वैभव साखरेकडून कुंकूमपुजा, आराधनी महिलांंचा जागर मेळावा
सोलापूर प्रतिनिधी
कसबादेवी मंदिराला फुला फळांनी सजवण्यात आले होते. भक्ती मय वातावरणात घटस्थापना करण्यात आले. यावेळी सुनील सुनील मसरे सौ मसरे यांच्या हस्ते घटस्थापना व पूजा करण्यात आले. यावेळी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे जयघोष, संभाळांचा निनाद मन भाराऊन गेले. देवीच्या मूर्तीला अलंकार पूजा करण्यात आल्यामुळे मूर्तीचे रूप तेजस्वी दिसत होते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून देवीचे महात्म्य आहे. उत्तर कसबा येथील तरटी नाका पोलिस चौकी बोळात कसबा देवी आहे. या मंदिरात सुमारे ६०० वर्षांची असल्याचे सांगण्यात रामपा मसरे पूर्वजांनी उत्तर कसबा भोगडे गल्ली येथे मंदिर बांधले आहे. पूर्वजांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर हे मंदिर सन १९८३ मध्ये नवीन सभामंडप बांधण्यात आला. सन २०२२ मध्ये मंदिरामध्ये गाभाऱ्याचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वी गाभाऱ्यात जाण्यासाठी दोन फुटी प्रवेशद्वार होते. आज चार फुटी प्रवेशद्वार आहे. नवरात्र निमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विजयादशमीला रूपा भवानी मातेची पालखीची मिरवणूक असते. शमीवृक्ष (पाकऺ चौक) पालखी कसबा देवी मंदिरात येते.महाआरती, महाप्रसाद वाटप होतो. काही काळ विसावा घेतल्यानंतर रुपाभवानी कडे मार्गस्थ होते. अष्टमीला मल्लिकार्जुन मंदिराजवळ तम्मा मसरे यांच्या घराजवळ जगदंबा मंदिरातून पालखी या मंदिरात येते.सातव्या माळेला करावी महिलांचा मेळावा असतो. देवीची गाणी गायली जातात. नारळ, पानसुपारी, कुमकुमाचऺन देऊन सन्मान करण्यात येते.
ट्रस्टी अध्यक्षपदी सुनील मसरे. उत्सव कमिटी अध्यक्ष कैलास भोगडे, उपाध्यक्ष सचिन म्हेत्रे, कार्याध्यक्ष आपासाहेब बिराजदार, सचिव रविराज कोरे, सदस्य वैभव साखरे, भारत सुरवसे राहुल भोगडे, श्रीकांत भोगडे, धनश्याम महाजन, दीपक बिराजदार, केदार भोगडे,,शिवलिंग भोगडे,सोमशेखर भोगडे, राजू पांढरे, बाळू कानाडे, सारंग मसरे, मनिष मसरे, सुनील मसरे यांच्या मुख्यनियोजनासाठी मदत होते.
येत्या सहा महिन्यात नवीन मूर्ती स्थापन करणार
मंदिरातील मूर्ती ५००-६०० वर्षापूर्वीची आहे. येत्या सहा महिन्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नवरात्रात रोज पूजा, अभिषेक,आरती,होमविधी, प्रसाद वाटप असते. भाविकांची गर्दी असते. सचिन म्हेत्रे उपाध्यक्ष.