सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट इंनोव्हेशन कौन्सिल आयोजित महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट च्या सहकार्याने 'उद्योजकता जनजागृती शिबिर'तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी एमसीईडी जिल्हा समन्वयक श्री.राम सुतार, श्री.नागेश कोकरे,प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य तथा मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.रवींद्र व्यवहारे,डॉ.विजयकुमार बिरादार,आयआयसी प्रेसिडेंट प्रा.श्रीकांत जगताप, प्रा. योगेश शेटे, प्रा.सुमेध पाठक उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.रवींद्र व्यवहारे यांनी प्रास्ताविका मध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्रातील कल्पना कशाप्रकारे सत्यात उतरवली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्रात केलेले संसोधन व प्रोजेक्ट याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रथम सत्रातील वक्ते श्री.नागेश कोकरे यांनी नविन उद्योगासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान, सेल्फ मोटीवेशन, नविन कल्पना, मार्केटिंग याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . द्वितीय सत्रातील वक्ते श्री.अरविंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी कौशल्याचा वापर उद्योगामध्ये कसा करावा, उद्योगामध्ये गुणवत्ता कशी टिकवावी, उद्योगात सॉफ्ट स्किलचा वापर कसा करावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तृतीय सत्रातील वक्ते श्री.राम सुतार यांनी उद्योगासाठी कॅटेगरीनुसार मिळणाऱ्या शासकीय योजना, शासकीय कार्यालयाची माहिती व अनुदान व वित्तीय साहाय्य याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कोमल आवताडे व सृष्टी नवले यांनी केले.