वर्धा प्रतिनिधी
बेलदार समाज वर्धा यांच्या वतीने बेलदार समाजाच्या हनुमान मंदिरात चाय पे चर्चा कार्यक्रमाचे नियोजन केले होते. बेलदार समाजात झालेल्या घडामोडी व पुढे होणाऱ्या हालचाली या विषयावर ही चर्चा रंगली, नुकताच राष्ट्रीय ओबीसी आयोग यात १६जून २०२३ ला टाकलेल्या बेलदार समाज महाराष्ट्र यांची याचिका व त्यानुसार झालेला पाठपुरावा बेलदार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते दिल्ली येथील राजेश अडपावार, मुबंई मंत्रालयातील मिलिंद कन्नमवार आणि राज्य मागासवर्गीय आयोग व राज्यसरकार , राष्ट्रीय ओबीसी आयोग २०११ ला रिजेक्ट झालेला अहवाल नागपूर संघटने जवळ आल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२३ सह्यान्द्री मुबंई येथे झालेली हेरिंग, कार्याची पद्धत सर्व या मिटींग मध्ये मुकुंद अडेवार यांनी सांगितले, रोहिणी आयोग, भटके विमुक्त, शिक्षण, घरकुल, माननीय उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या सोबत झालेली चर्चा , पुढे काय होणार, अश्या अनेक सामाजीक विषयावर मंथन झाले, वर्धा येथे मागील महिन्याभरा पासून माननीय जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्रकाशजी बमनोटे व भटके विमुक्त सेल वर्धा जिल्हा च्या सोनालीताई कोपुलवार यांच्या कडून माहिती घेऊन पुढील नियोजन ठरविण्यात आले.
सर्व जिल्ह्यात बेलदार समाज वर्धा प्रमाणे नियोजन व्हावे असेही यावेळी ठरविण्यात आले,तर कोणत्याही कमिटी सामोर जात असताना पूर्वीच समाजाचे नियोजन तयार असले पाहिजे, प्रत्येक महिन्यात दोन वेळा समाजाची मिटींग होणे गरजेचे ज्यामुळे समाजाचे प्रश्न सतत समजण्यात अडचण येत नाही, आणि पुढे ते मांडता येते, १९६१ च्या दाखल्यामुळे होणाऱ्या अडचणी, रक्त नात्याचे संबंध असलेले आदेश हे सर्व सांगून माननीय समाजकल्याण अधिकारी यांचे सोबत मिटींग लावण्यासाठी प्रकाश बमनोटे यांचे सोबत चर्चा झाली.
यावेळी बेलदार समाजाचे मुकुंद अडेवार,लक्ष्मीकांत माडेवार,अनिल जंगीतवार, प्रकाश बमनोटे, सुधाकर कुरकुटवार, सुधीरजी ताटेवार ,द्वारकाताई इमडवार, सोनालीताई कोपुलवार,अनिल चव्हाण , संजय कोट्टेवार,रुपेश कुचेवार,भरत कोकावार,सुनील दुप्पलवार, विजयराव बोरगमवार,विजय कोपुलवार,मोहन भांडारवार,आनंद कसटवार,गणेशराव पोचमपल्लीवार,सुनील कोपुलवार,राजुभाऊ गुरडवार,संजय कोपुलवार उपस्थित होते.