खडकी प्रतिनिधी
ऑल इंडिया डिफेन्स एम्पलोयीज फेडरेशनच्या वतीने सीक्यूएइ औंध येथे कार्यालयातील कर्मचारी एम. एस. मातसराम यांना कार्यसम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मातसराम यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तसेच कर्मचाऱ्या ंच्या सेवेसाठी आपले बहुमूल्य साथ दिली आहे, मातसराम यांच्या विशेष कार्यासाठी कार्यसम्राट पुरस्कार देण्यात आला.
सीक्यूएइ येथील कर्मचारी मातसराम यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला, कार्यक्रमात मुकेश कोरबोल्लू, दीपक कांबळे, संतोष पोकली, डॅनी आरसा यांच्या हस्ते मातसराम यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मातसराम यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक ठिकाणी लढा दिला, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली, सुमारे ३२ वर्ष कोणताही भेदभाव न करता त्यांनी सेवा केली असे मत सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना येणारे समस्याना कसे तोंड द्यावे हे मातसराम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शिकविले. रुग्णालयामधील अडचणी, कामगारांच्या पेन्शन बद्दल प्रश्न आदी समस्यावर कर्मचाऱ्यांच्या नेहमी पाठीशी असत, त्यामुळे त्यांच्या या विशेष कार्याबद्दल कार्यसम्राट पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद विनोद, प्रकाश कुमार, गौरव नलावडे, रोशन भालेराव, किरण दाभाडे, विजय कुंभार, दीपक पोल, अजिंक्य भोसले, सुरेश ओवी, रवींद्र अडसुळे, रामदास पवार यांनी परिश्रम घेतले. फोटो सीक्यूएइ औंध येथील कार्यालयातील कर्मचारी एम. एस. मातसराम यांच्या विशेष कार्याबद्दल कार्यसम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करताना मुकेश कोरबोल्लू, दीपक कांबळे, संतोष पोकली आदी मान्यवर दिसत आहेत.