चिंचणी प्रतिनिधी
जि.प.शाळा व स्वयंपाकघर भेटी दरम्यान मध्यान पोषण आहारातील भात स्वतः खाऊन पाहिला चवी विषयी खूप समाधान व्यक्त केले, मुलांशी थेट संवाद साधला, मुलांनी पण मुलाखत घेतली, कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यास केंद्र, रेस्ट हाऊस, वरदायिनी माता मंदिर,ग्रामीण वस्तुसंग्रहालय,स्मशानभूमी, चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र भेट,आणि चुलीवरचे मनसोक्त जेवण करून चिंचणी करायचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
यावेळी आव्हाळे म्हणाल्या की,चिंचणीकरांनी केलेले रचनात्मक काम बघून खूप भारावून गेले भविष्यात या गावा बरोबर भरपूर काम करू या. सोलापूर सासर आणि चिंचणी माहेर करू या अशी भावना व्यक्त केली. चिंचणीकरांनी केलेल्या कामाचे डॉक्युमेंटेंशन करणे,येथे जास्तीत जास्त प्रशिक्षण घेणे, भविष्यात या गावाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी स्वतः लक्ष घालून प्रयत्न करणे. पुन्हा लवकरच भेटायला येणार त्यावेळी कुठलाही कार्यक्रम न घेता गावातील स्त्री पुरुष आणि मुलांशी फक्त गप्पा मारूया.
यावेळी सोबत गटविकास अधिकारी प्रशांत काळे ,मोहन अनपट व ग्रामस्थ उपस्थित होते.