मायणी प्रतिनिधी
मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, खटाव तालुक्यातील मायणी गावात 'मातोश्री अनाथ आश्रम' विशाल चव्हाण या माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील भारारुन टाकणारे आहे. माणूस म्हणून जगण्याचा अर्थ समजायचा असेल तर या संस्थेस संस्थेतील निराधार, अत्याचारीत, पिडीत, मनोरुग्ण माणसांना आवर्जून भेटलं पाहिजे. खरंतर अनाथ हा शब्द अंगावर काटा आणणारा आहे. परिस्थितीचे चटके बसल्येल्या या माणसांना आधार देत पुन्हा त्यांच्या कुटुंबात सोडणारा विशाल चव्हाण हा अवलिया मायणीत आहे, हे किती माणसांना माहिती आहे? असे उद्गार अमरदिप आपगे यांनी आश्रमात बोलताना व्यक्त केले.
आंतरराषट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे हात गोरगरीब शेतकरी, कष्टकरी यांच्या मदतीकरिता नेहमीच पुढे असतात. तालुक्यात दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कोव्हीड महामारी असो नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मायणी येथील या मातोश्री आश्रमाला त्याच भावनेतून आंतरराषट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग सदस्यांसमवेत नुकतीच भेट देवून या आश्रितांची आस्थेने विचारपूस केली. माणसाला माणसातून उठण्याची वेळ या अश्रीतांवर का आली हे जाणून घेतली.मातोश्री आश्रमाच्या आवर्जून भेटीप्रसंगी अमरदिप आपगे यांनी जीवनावश्यक वस्तू , किराणा , ब्लँकेट, औषधे इत्यादींची मदत प्रदान केली.
यावेळी डॉ.संतोष डांगे,बाबासाहेब कुंभार,इम्रान जमादार,दत्ता कोळी,विशाल चव्हाण ,प्रदीप देशमुख,वीरधवल ढवळीकर,नानासो चव्हाण,अमोल भिसे,दादा मुलाणी उपस्थित होते.
अमरदीप आपगें म्हणाले अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत पुरुष व महिला बरेच कारणांनी निराधारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे उद्ध्वस्त जीवन बसविण्याचा प्रयत्न करणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. विशाल चव्हाण यांनी घरची परिस्थिती आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी अशा परिस्थितीवर मात करत अनाथ लोकांचे पालकत्व स्वीकारले असून ते ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडत आहेत.अशा प्रकारच्या दुर्दैवी जीवांना आधार देण्याकरिता पुढे येऊन महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे. आणि या लोकांचे पालकत्व स्वीकारले आहे.