सोलापूर प्रतिनिधी
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिनी शिक्षक दिनी सालादाप्रमाणे गुरूविद्या प्रतिष्ठानचे यंदाही गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
यंदाच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड समितीचे काम श्री सोमशेखर भोगडे श्री सातलिंग शटगार, सौ राजश्री तडकासे, सौ श्रीदेवी यळमेली, सौ नर्मदा कन्नकी, प्रा. प्रभाकर नागणसुरे, श्री विजयकुमार भोगडे यांनी पुरस्कारासाठी दहा जणांची निवड केली.
यंदाच्या वर्षी पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रुती बागेवाडीकर मुख्याध्यापिका मेहता माध्यमिक शाळा,सोलापूर. मीनाक्षी संजीवकुमार मेंथे( सहशिक्षिका) इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर,सौ सुनंदा शिवाजी जाधव, (सहशिक्षिका) बेबळगी विद्यालय सोलापूर,सौ सीमा सुनील जाधव (सहशिक्षिका) मनपा मराठी मुलांची शाळा क्र 28 सोलापूर, चंद्रशेखर हनुमंत चौगुले (सहशिक्षक).के.हंचाटे विद्यालय. अक्कलकोट, सोलापूर, अभिनंदन वज्रकांत विभुते(सहशिक्षक )महावीर हायस्कूल सोलापूर, प्रा.शावरू रेवणा जडगे (प्राध्यापक) एस .व्ही.सी. एस जुनियर कॉलेज,एम.आय.डी.सी सोलापूर, जनार्दन प्रभाकर वाघमारे (सहशिक्षक) आदर्श बालक मंदिर सोलापूर, अविनाश आकाराम आलदर(सहशिक्षक) शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर,. उमेश हनुमंत मल्लापुरे(प्रयोगशाळा परिचर ) सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर.
गुरुविद्या आदर्श पुरस्कार दि ०६/९/२३ रविवार रोजी सायंकाळी ठिक ०५/३० वाजता समॄदी हॉटेल , सिध्देश्वर पेठ, सोलापूर पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मुतीचिन्ह, प्रमाणपत्र, मोत्याचे माळ,गुच्छ असे असणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिवा सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले आहे.